PC: saamtv
वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला संतुलन, विस्तार आणि शुभतेचा कारक मानण्यात येतं. गुरु वेळोवेळी राशी आणि स्थिती बदलत असतो. ज्याचा सर्व १२ राशींवर परिणाम होतो. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरुने कर्क राशीत प्रवेश केला आणि आता ११ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान तो कर्क राशीत वक्री होणार आहे.
गुरुची वक्री स्थिती
सध्या गुरु अतिचारी अवस्थेत आहे. याचाच अर्थ तो एका वर्षात एकच राशी पार करण्याऐवजी सात वर्षांत सर्व १२ राशींमध्ये एकदा प्रवेश करणार आहे. कर्क राशीत वक्री असताना गुरु पंचम दृष्टिने मंगळ आणि नवम दृष्टिने शनीवर प्रभाव टाकतो. या संयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.
मकर राशी
गुरु सप्तम भावात वक्री होत असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. दांपत्य जीवनात आनंद आणि सौख्य वाढणार आहे. नोकरीत नवीन संधी, पदोन्नती आणि धनलाभाचे योग तयार होणार आहे.
कन्या राशी
गुरु एकादश भावात वक्री होणार आहे. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना दीर्घकाळ रखडलेल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. संतानविषयक निर्णय घेण्याचा योग्य काळ आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहील.
वृषभ राशी
गुरु तृतीय भावात वक्री होणार असल्याने वृषभ राशीच्या व्यक्तींना भाग्याचा पूर्ण साथ मिळू शकतो. गुरु अष्टम भावाचा स्वामी असून नवम भावावर दृष्टि टाकणार आहे. त्यामुळे आध्यात्मिक प्रवृत्ती, पूजा-पाठ आणि धार्मिक कार्यांमध्ये सहभाग वाढणार आहे. तीर्थयात्रेची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले पैसे मिळू शकणार आहेत.
You may also like

रोज़ˈ के खाने में छुपा है ज़हर. खोखला बना देता है एल्युमिनियम बर्तनों में पका खाना. जानिए किस धातु के बर्तन में पकाना है सबसे सेहतमंद﹒

Video:ˈ अलग-अलग जगहों के केले के साइज बता रहा था शख्स, एंकर ने दिया मज़ेदार रिएक्शन..﹒

आज का पंचांग (Aaj Ka Panchang) 4 नवंबर 2025 : आज वैकुण्ठ चतुर्दशी, जानें पूजा का शुभ मुहूर्त और राहुकाल का समय

ताजमहलˈ का वो दरवाजा जिसे खोलने से सरकार भी डरती है, क्लिक करके जाने पूरी खबर﹒

रक्त शर्करा को तुरंत कम करने के प्रभावी उपाय





